१) संस्थेचे नाव : सेवानिवृत्त वनकर्मचारी संघ, महाराष्ट्र.

२) कार्यालय : संघाचे कार्यालय वाचनालय, चौथा मजला, वनभवन, गोखले नगर, पुणे – ४११०१६ येथे राहील. संघाचे कार्यालय पुणे शहरामध्ये सोईनुसार बदलण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.

2.१) कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य हे संस्थेचे कार्यक्षेत्र राहील. महाराष्ट्र राज्यात स्थाईक असणाय्रा सर्व सेवानिवृत्त/भूतपूर्व वनकर्मचार्यांना संघाचे सभासद होता येईल. संघास कालांतराने महाराष्ट्र राज्यातील व अखील भारतातील सेवानिवृत्त वनकर्मचारी संघांशी अथवा तत्सम संघ, अधिकार मंडळ यांचेशी संलग्न होता येईल. सेवानिवृत्त/भूतपूर्व वनकर्मचारी म्हणजे वानिकी क्षेत्रात काम करणारे वन, सामाजिक वनीकरण व एफडीसीएम मधील सेवानिवृत्त वनकर्मचारी असतील.

३) उदेश व ध्येय :

१. पर्यावरणाचा होत असलेला ह्रास थांबविण्यासाठी जनजागृती मोहिमा राबविणे. २. जनजागृतीसाठी वनांची महती व माहिती देणारे बुलेटीन/मासिक अथवा त्रैमासिक प्रसिद्ध करणे. ३. निवृत्त वनकर्मचाय्रांच्या सेवानुभवाचा, व्यावसायिक कौशल्याचा व त्यांच्या अंगच्या विविध गुणांचा उपयोग करून घेउन पर्यावरण संवर्धनाचे विविध कार्यक्रम राबविणे. ४. महाराष्ट्र राज्यातील निवृत्त कर्माचाय्रांच्या निवासाचे पत्ते, त्यांचे व्यावसायिक कौशल्य इत्यादी संदर्भात सर्वांगीण माहिती संकलीत करणे. ५. महाराष्ट्र राज्यातील ज्या वन/वनोपजे/रोपवाटीका/उपवने यांचेशी संबंधीत असलेल्या शासकीय/अशासकीय संस्था, उद्योगधंदे, उद्योजक यांना वनसेवेतील निवृत्त कर्मचाय्रांच्या अनुभवाची गरज आहे, त्यांची माहिती संकलीत करणे. ६. उपरोक्त संस्था, उद्योगधंदे व उद्योजक यांची अशा सेवांची गरज व निवृत्त कर्मचाय्रांचे व्यावसायिक कौशल्य तसेच त्यांची व्यवसायाची निकड यांचा समन्वय साधून या दोन्ही गोष्टींची सुयोग्य सांगड घालणे. ७. एक वनविषयक व्यावसायिक कौशल्य व उचित तंत्रज्ञान यांचा वापर करू शकणारी स्वयंसेवी अशासकीय संघटना म्हणून संशोधन व वनसंवर्धनासंबंधी स्वतंत्र कामे संघटनेने आपल्या जबाबदारीवर पार पाडणे. ८. वनसंवर्धनासंबंधी ज्या खाजगी/सहकारी संस्था/ उद्योगधंदे व उद्योजक यांना तांत्रिक सल्याची गरज असेल त्यांना तो उपलब्द्ध करून देणे. ९. रोपवाटीका व्यवस्थापन, उच्च प्रतीच्या वन बीजांचा पुरवठा, वन उद्यानांची निर्मिती व देखभाल व इतर तत्सम कामे स्वतंत्ररीत्या आपल्या जबाबदारीवर पार पाडणे. १०. सेवानिवृत्त वन कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या काही समस्या असतील तर त्यांची सोडवणूक करण्यास मदत करणे. ११. निवृत्त वन कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी कल्याणकारी योजना राबविणे. १२. महाराष्ट्र राज्याच्या दुर्गम भागातील सेवारत वनकर्मचाय्रांच्या सक्षम पाल्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. १३. सेवानिवृत्त वनपाल व वनरक्षक यांच्या सक्षम पाल्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. १४. संस्थेसाठी कल्याणकारी निधीची निर्मिती करणे व त्याचा विनियोग निवृत्त वन कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी कल्याणकारी योजना राबविणेसाठी करणे. १५. संस्थेच्या कल्याणकारी निधीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे व त्यातून मिळणाय्रा उत्पनाचा विनियोग निवृत्त वन कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी कल्याणकारी योजना राबविणेसाठी करणे.

४) संस्थेचे हयात विश्र्वस्त : सर्वश्री. दतात्रेय हरी दातार, वसंत सीताराम जोशी, जब्बार हमीद खान.