१) व्याख्या: संघ म्हणजे सेवानिवृत्त वनकर्मचारी संघ, महाराष्ट्र
५) सभासदांचे प्रकार:
१) आजीव सभासद: जे सेवानिवृत्त/भुतपूर्व वनकर्मचारी एक रकमेने संघास रु. २०००/- (दोन हजार मात्र) वर्गणी जमा करतील अशांना आजीव सभासद होता येईल.
२) सर्वसाधारण सभासद: जे सेवानिवृत्त/भुतपूर्व वनकर्मचारी संघास वार्षिक वर्गणी रु. २००/- (दोनशे मात्र) जमा करतील ते सर्वसाधारण सभासद होण्यास पात्र असतील.
६) सभासदत्व रद्द करणे:
१) ज्या सभासदांचे वर्तन संघाचे हितास बाधा आणणारे आहे असे आढळून आल्यास सर्वसाधारण सभा त्या सभासदाचे सभासदत्व रद्द करू शकेल.
२) एखादा सभासद पूर्व सूचना न देता लागोपाठ बारा मासिक सभांना अनुपस्थित राहिला तर अथवा एखाद्या सभासदाने सुचना केल्यानंतर सुद्धा तीन महिन्यामध्ये वार्षिक वर्गणी भरून सभासदत्वाचे नुतनिकरण न केल्यास त्या सभासदाचे सभासदत्व आपोआप रद्द होईल. मात्र अशा सभासदांकडून पुन्हा नव्याने स्भासदत्वासाठी अर्ज घेउन त्यांना सभासदत्व देता येईल. तो अधिकार कार्य कारी मंडळास राहील.
७) संघाच्या मध्यवर्ती व सर्वसाधारण सभा, सभेचे अधिकार व सभेचे कार्य:
७.१) वार्षिक सर्वसाधारण सभा: वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे वर्ष संपल्यानंतर दोन महिन्याच्या आत घतली जाईल. सभेमध्ये खालील विषय चर्चेत घेतले जातील.
७.१.१) संघाच्या वार्षिक अहवालावर चर्चा करणे व त्यास मान्यता देणे.
७.१.२) संघाच्या वार्षिक लेखा-हिशोब पत्रावर चर्चा व त्यास मान्यता देणे.
७.१.३) संघाचे पुढील वर्षाचे वार्षिक अंदाज पत्रकावर चर्चा व मान्यता देणे.
७.१.४) कार्यकारी मंडळाची निवड.
७.१.५) संघाच्या कार्याविषयी सूचना.
७.२) मासिक सर्वसाधारण सभा: संघाची मासिक सर्वसाधारण सभा महिन्यातून एकदा घेतली जाईल. या सभेस सर्व सभासदांना उपस्थित राहता येईल. या सभेस गण्पुर्तीची आवश्यकता नाही.
८) संघाच्या मध्यवर्ती व वृत्तस्तरिय सर्वसाधारण सभेची सूचना व गणसंख्या:
८.१) वार्षिक सर्वसाधारण सभा:
८.१.१) संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना १४ दिवस अगोदर दिली जाईल.
८.१.२) संघाच्या सभासदांपैकी १/३ सभासदांची उपस्थिती गणपूर्तीसाठी आवश्यक राहील. गणपूर्ती नसल्यास अर्ध्या तासाने सदर सभा त्याच ठिकाणी पुन्हा भरविली जाईल. व सदर सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
८.२) विशेष सर्वसाधारण सभा:
अ) विशेष सर्वसाधारण सभा कार्यकारी मांडळास जरूर वाटल्यास अथवा संघाच्या ११ (अकरा) सभासदांच्या स्वाक्षरीने व कारणे देउन बोलविता येईल.
ब) अशा विनंती/मागणी नंतर ८ (आठ) दिवसांची नोटीस देउन १५ (पंधरा) दिवसामध्ये ही सभा बोलवावी लागेल.
क) अशा सभेसाठी १/३ सभासद गणपूर्तीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ड) या सभेच्या विषय सूचीवर मागणीचे विषयच फक्त राहतील. व फक्त अशा विषयांवरच चर्चा करता येईल.
ई) या सभेमध्ये बहुमताने निर्णय घेतले जातील. व समान मते पडल्यास अध्यक्षांना जादा मत देण्याचा अधिकार राहील.
९) संघाचे मध्यवर्ती व वृत्तस्तरिय कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांची रचना:
९.१) संघाचे विस्तारीत कार्यक्षेत्र ल्क्षात घेता, मध्यवर्ती कार्यकारी मंडळामध्ये १८ (अठरा) पदाधिकारी खालीलप्रमाणे राहतील.
१) अध्यक्ष, २) उपाध्यक्ष-१, ३) उपाध्यक्ष-२, ३) कार्याध्यक्ष, ४) कार्यवाह, ५) सहकार्यवाह, ७) कोषाध्यक्ष. ८) ते १८) पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली या अकरा वन वृत्तस्तरावरील कार्यकारीणीचे सहअध्यक्ष असे मिळून एकून अठरा सदस्य असतील.
९.२) उपविधी क्र. १५.३ अनुसार संघाचे मध्यवर्ती कार्कारी मंडळ जरुरीप्रमाणे संघाचे सभासद अथवा अन्य तज्ञ यांची संघाच्या कार्यकारीनीवर नियुक्ती करू शकेल.
९.३) संघाच्या कार्यकारिणी मंडळ पदाधीकाय्रांची निवड वार्षिक सर्वसाधारण सभा पॅनेल पद्धतीने करेल. आणी त्या कार्यकारी मंडळाची मुदत तीन वर्षांची राहील.
९.४) वन वृत्तस्तरावरील शाखेच्या कार्यकारी मंडळामध्ये सहअध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह व कोषाध्यक्ष असे पाच पदाधिका0री असतील.
११) पदाधिकारी आणी त्यांचे कार्य:
११.१) अध्यक्ष:
११.१.१) अध्यक्ष प्रत्येक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.
११.१.२) संघाच्या विशेष सभांच्या व त्रैमासिक सभांच्या तारखा, वेळा व स्थान ठरविणे.
११.१.३) संघाच्या हिशोबावकोषाध्यक्षर व कार्यवाहासह नियंत्रण ठेवणे.
११.२) कार्याध्यक्ष:अध्यक्षांना सहाय्य करणे.
११.३) उपाध्यक्ष:अध्यक्षांचे अनुपस्थितीत अध्यक्षांची कामे करणे व अधिकार वापरणे.
११.४.१,२,३,४)कार्यवाह:
१. संघाच्या सर्व सभांच्या बैठकीची व्यवस्था करणे, सभासदांना पूर्वसूचना देणे व सभांचे वृत्तांत लिहणे.
२. संघाचे वार्षिक अहवाल व अंदाजपत्रक तयार करणे व कार्यकारी मंडलापुढे ठेवणे.
३. संघाचे पत्रव्यवहार, मिळकत व दप्तर सांभाळणे.
४. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना संघाच्या विशेष कामासाठी सहाय्य करणे.
११.५)सह्कार्यवाह:कार्यवाहांना सहाय्य करणे व त्यांचे अनुपस्थितीत त्यांचा कार्यभार सांभाळणे.
११.६.१,२,३,४,५,६,७) कोषाध्यक्ष:
१. संघास आलेल्या देणग्या व वर्गण्या तसेच इतर निधी जमा करून घेणे व पावत्या देणे.
२. संघाचे होशोब नियमानुसार ठेवणे.
३. बँक व्यवहार करणे.
४. वार्षिक हिशोब, नोंदणीकृत हिशोब तपासनिसाकडून तपासून घेणे व कार्यकारी मांडळास सादर करणे.
५. संघाच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचेसभासदांच्या वर्गणीसंबंधी पुस्तके ठेवणे व जमाखर्चाची माहिती प्रत्येक तीन महिन्यांनी कार्य कारी मंडळास देणे.
६. संघाचे आर्थिक व्यवहार उच्च प्रतीचे राहतील याची व्यवस्था करणे.
७. जर काही कारणास्तव कोषाध्यक्ष पद रिकामे झाले तर त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची कामे पर्यायी व्यवस्था होईपर्यन्त संघाचे कार्यवाह पार पाडतील.
१२) संघाच्या मध्यवर्ती व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळाची सभा व मागणीची सभा:
१२.१) संघाच्या मध्यवर्ती व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळाची सभा तीन महिन्यातून किमान एकदा होईल आणी ती पुणे किंवा अन्य वनवृत्ताच्या मुख्यालयाचे ठिकाणी सोयीनुसार घेण्यात येईल.
१२.२)मागणीची सभा: कार्यकारी मंडळाच्या किमान तीन सभासदांच्या सहीने विनंती आल्यास घेता येईल. त्यासाठी दोन दिवसांची सुचना कार्यकारी मंडळाच्या सभासदांना दिली जाईल.
१३) संघाच्या मध्यवर्ती व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळाची सभेची सूचना व गणसंख्या:
१३.१) संघाच्या मध्यवर्ती व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळाच्या पुढील सभांची सुचना अनुक्रमे प्रत्येक त्रैमासिक व मासिक सभांमध्ये दिली जाईल.
१३.२) या सभेस मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या पाच व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळाच्या चार सभासदांची गणपूर्ती राहील.
१४) संघाच्या मध्यवर्ती व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचे उपविधी:
१४.१) कार्यकारी मंडळाच्या सभासदांची निवडणूक तीन वर्षांतून एकदा पद्धतीने होईल.
१४.२) सभासदांची निवडणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत होईल.
१४.३) संघाच्या सभासदांची कार्यकारी मंडळाचे पॅनेलकरीता खालील प्रमाणे पात्रता राहील.
अ) ज्या सभासदांनी नियम ५ मध्ये नमूद केलेली वर्गणी भरली आहे.
ब) जे कार्यकारी मंडळाच्यासभासद कमीतकमी ३० सभांना हजर राहिले आहेत.
क) जे सभासद शारीरिक सुस्थितीत आहेत.
ड) जे सभासद संघाच्या निरनिराळ्या उपक्रमात सक्रीय भाग घेतात’
१४.४) अ) कार्यकारी मंडळाच्या पॅनेलमध्ये भाग घेउ शकणाय्रा सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी आठ दिवस अगोदर अर्ज करावेत. अर्जावर सुचक व अनुमोदक म्हणून अन्य सभासदांच्या सह्या घेणे आवश्यक आहे.
१४.४) ब) अर्ज मंजूर अगर नामंजूर करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. नामंजूर केलेल्या अर्जाबाबत कारणे देणे बंधनकारक नाही.
१४.५) निवड अगर नेमणूक पॅनेल पद्धतीने होईल.
१५) कार्यकारी मंडळातील रिक्त पद भरणे बाबत:
१५.१) कार्यकारी मंडळातील रिक्त जागा उपविधी दहामध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यकारी मंडळ नेमणूक करून घेईल.
१५.२) रिक्त पदावर निवडलेल्या सभासदाची मुदत कार्यकारी मंडळाच्या मुदती इतकी राहील.
१६) संघाचे मध्यवर्ती व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळ व त्यांचे कार्य:
१६.१) संघाच्या कार्यकारी मंडळात संघाचे सर्व अठरा पदाधिकारी व वृत्तस्तरीय कार्यकारी मंडळात पाच पदाधिकारी राहतील. त्यांची निवड वार्षिक सर्वसाधारण सभेत होईल. कार्यकारी मंडळाची मुदत तीन वर्षे राहील.
१६.२) कार्यकारी मंडळाचे कार्य पुढीलप्रमाणे राहील.
१६.२.१,२,३.४,५)
१. संघाचे दैनदिन व्यवहार पाहणे.
२. संघाचे जमाखर्च ठेवणे.
३. संघाच्या मालमत्तेची देखरेख ठेवणे.
४. संघाच्या सभासदत्वासाठी आलेल्या अर्जाचा विचार करून स्वीकारणे अथवा नाकारणे.
५. संघाचे वार्षिक अंदाजपत्रक, धोरण, कार्यक्रम ठरविणे.
१६.३) अ) कार्यकारी मंडळातील सभासदांच्या खालीलप्रमाणे समित्या सुरवातीस नेमता येत्तेल.
अ) व्याख्यान समिती. ब) करमणूक समिती. क) नियोजन समिती. ड) तांत्रिक समिती. इ) सहल समिती. फ) सांस्कृतिक कार्यक्रम समिती. या व्यतीरीक्त्त इतर विषयांवर समित्या कार्यकारी मंडळास नमता येतील. या समित्यांवर सभासदांपैकी अथवा तज्ञ नियुक्त करता येतील.
ब) समित्यांचे अहवालावर चर्चा करून कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम कार्यान्वित करणे.
१७) संघाचा निधी, मिळकत विनियोग:
१७.१) संघाच्या निधीमध्ये प्रवेश शुल्क, वर्गण्या, देणग्या, अनुदाने, संघाने स्वीकारलेल्या कामापोटी मिळालेल्या शुल्क रकमेतून ऐच्छिक देणगी आणी वृत्तस्तरावर प्राप्त झालेल्या महसुलातून खर्च वजा जाता राहिलेल्या रकमेची २०% रक्कम यांचा समावेश राहील.
१७.२) निधीचा विनियोग कार्यकारी मंडळाचे सभेत ठरविला जाईल.
२१) संस्थेचे व वृत्तस्तरीय शाखेचे बँक व्यवहार: