१. महाराष्ट्रातील प्रकल्प:
१) वन विकास यंत्रणांतर्गत कामांचे मूल्यमापन
सन २००४ ते २००८ मध्ये सेवक संघाच्या पुणे शाखेने महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या पुणे, जुन्नर, बुलढाणा, ठाणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, यवतमाळ, पुसद, पूर्व व पश्चिम नाशिक आणी सांगली व भोर ह्या उप वन विभागातील तसेच नाशिक शाखेने सन २०१५ मध्ये पूर्व व पश्चिम नाशिक वन विभागातील आणी अमरावती शाखेने सन २०१६ मध्ये अमरावती, धुळे, ह्या वन विभागातील वन विकास यंत्रणांतर्गत कामांच्या मूल्यमापनाची क्षेत्रीय कामी संस्थेच्या २४ सभासदांनी पार पाडली. व ह्या कामांचे अहवाल सर्वश्री. बा. पा. देसाई, अ. ना. बल्लाळ, मो. ह. खेडकर, स. दि. दक्षिणदास, वि. त्र्यं. पत्की व न. हु. न. शेख ह्यांनी केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाकडे सादर केले. सदर कामासाठी पुणे शाखेने केलेल्या कामापोटी संस्थेस एकूण रु. ५,०६,४६५/- इतके मानधन प्राप्त झाले. त्यापैकी कामापोटी रु. ३,४९,११६/- इतका खर्च होउन संस्थेस रु. १,५७,३४९/- इतका (३१%) इतका निव्वळ फायदा झाला. तसेच अमरावती शाखेने सन २०१६ मध्ये उप वनसंरक्षक, अमरावती यांचे वतीने अमरावती येथे ५०,००० दुर्मिळ व औषधी रोपांची रोपवाटीका तयार केली. ह्या रोपवाटीकेच्या माध्यमातून अमरावती शाखेस रु. ३१,५०,०००/- इतके उत्प्पन प्राप्त होणार आहे.
२) ‘वनस्पती व वन्यजीव संवर्धन योजना, तिरोडा’
‘अडानी थर्मल पॉवर, महाराष्ट्र लिमिटेड’ ह्या कंपनीमार्फत प्रस्तावीत करण्यात आलेल्या तिरोडा (गोंदिया जिल्हा) येथील कोळसा इंधनावलंबित ३३०० मेगावॅट क्षमतेच्या ‘तिरोडा तीव्र औष्णीक उर्जा प्रकल्पाच्या’ सभोवतालच्या १० किमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील क्षेत्रासाठी ‘वनस्पती व वन्यजीव संवर्धन योजना’ तयार करण्याचे काम संस्थेचे सभासद श्री. वि. त्र्यं. पत्की यांनी ‘अडानी हौस’ मध्ये ‘कॉर्पोरेट मॅनेजर’ म्हणून काम पहात असलेले मध्य प्रदेश वन विभागाचे विभागीय वनाधिकारी श्री. अलोक पाठक त्यांच्या समवेत सन २०१० मध्ये पुर्ण केले. सदर योजना त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव अधिकारी यांना सादर करण्यात आली. सदर योजने साठी ‘अडानी थर्मल पॉवर, महाराष्ट्र लिमिटेड’ तर्फे संस्थेस आयकर वजा जाता रु. १,२१,५००/- इतकी फी देण्यात आली, त्यापैकी श्री. वि. त्र्यं. पत्की यांना संस्थेतर्फे रु. ५०,०००/- इतके मानधन देण्यात आले व कामासाठी रु. ३५,०००/- इतका खर्च झाला. ह्या कामातून संस्थेस रु. ३६,५००/- इतका फायदा झाला.
३) ‘वनस्पती व वन्यजीव संवर्धन योजना, केसरी फणसवडे:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी फणसवडे येथील ३८६.९९ हेक्टर क्षेत्रातील लोखंड खाणीसाठी परवानगी श्रीमती नीला व्ही. डेम्पो व श्री. श्रीनिवास व्ही. डेम्पो यांनी केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाकडे केली होती. त्या संदर्भात संस्थेचे सभासद सर्वश्री वि. त्र्यं. पत्की व न. हू. न. शेख यांनी श्री. यु. ए. नाईक यांचे सहाय्याने सन २०११ मध्ये प्रकल्प अहवाल तयार केला. सर्वश्री वि. त्र्यं. पत्की व न. हू. न. शेख यांनी त्यांना डेम्पो ग्रुपतर्फे मिळालेल्या मानधनातून प्रत्येकी रु. ५०००/- इतकी रक्कम संस्थेस देणगी रूपाने दिली.
४) वन व्यवस्थापनासाठी क्षमता विकास व कार्मचाय्रांचे प्रशिक्षण
‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी’ तर्फे देण्यात आलेल्या मृदु कर्जातून दि. २८.०६.०१२ झालेल्या करारानुसार वन व्यवस्थापनासाठी क्षमता विकास व कार्मचाय्रांचे प्रशिक्षण ह्या प्रकल्पाची सुरवात झाली. सेवक संघामार्फत सर्वश्री मा. ग. गोगटे, अ. रा. मसलेकर, व्ही. बी. सावरकर, वि. त्र्यं. पत्की व न. हु. न शेख ह्यांनी सदर प्रकल्पात वन सल्लागार या नात्याने योगदान दिले. प्रकल्पाचा कालावधी ३.५ वर्षे इतका होता. प्रकल्पांतर्गत वनरक्षक व वनपाल यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण सुधारणा योजना, वृक्षशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संयुक्त वनव्यवस्थापन, वनयांत्रिकी, वन्यजीव व्यवस्थापन, प्रशिक्षण विश्लेषण, वन व वन्यजीव कायदे, वन संरक्षण, कार्यालयीन व आर्थिक व्यवस्थापन, मृद व जल संवर्धन, वन उपयोगीता, व वन सवेक्षण ह्या विषयांसंबंधी शिक्षण साहीत्य व प्रमुख प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण योजना तयार करण्यात आली. तसेच प्रशिक्षित आघाडीच्या वनकर्मचाय्रांचे प्रत्यक्ष जागेवरील कामामधील प्रगतीचे मूल्यमापनही करण्यात आले. सदर कामापोटी सर्व सेवक सल्लागारांना मिळालेल्या मानधनातून प्रत्येक सल्लागाराने सेवकसाठी रु. १०,०००/- (एकूण रु. ५०,०००/- ) इतकी देणगी प्रदान केली. याखेरीज ह्या एकंदर कामातून सेवक संघासाठी रु. एक लाख इतका निव्वळ फायदा प्राप्त झाला.
२. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्प:
१) ‘निसर्गवाणी’ त्रैमासिक:
सेवानिवृत्त वनकर्मचारी संघातर्फे ‘निसर्गवाणी’ ह्या त्रैमासिकाचे जानेवारी २००५ ते ऑकटोबर २००८ पर्यंत १५ अंक प्रसिद्ध करण्यात आले. त्यापकी जुलै २००६ चा विशेषांक ‘वनविकास महामंडळाची तीन दशके’ ह्या शिर्षकान्वये व एप्रिल २००७ चा अंक ‘सामाजिक वनीकरण रोप्य महोत्सवी विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आला.
२) वृक्ष प्रजातींची माहिती:
‘सकाळ पेपर्स’ अंतर्गत साप्ताहीक ‘अॅग्रोवन’ च्या माध्यमातून नोव्हेंबर २००६ ते ऑकटोबर २००७ दरम्यानच्या ५२ अंकांतून विवीध २५ वृक्ष प्रजातींची लागवड, जोपासना व तोड ह्याविषयीची सविस्तर माहिती सेवकच्या १० सभासदांनी जनतेला करून दिली. सदर योजनेतून सेवक संघास एकंदर रु. १३००/- इतका फायदा झाला.
३) नागरी वनीकरण पुढाकार कार्यशाळा:
पुणे महानगरपालिका व सेवानिवृत्त वनकर्मचारी संघ, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथे दि. २६.१२.२००५ ते ०८.०२.२००६ दरम्यान नागरी वनीकरण पुढाकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेत वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभाग, पुणे मनपा, पुणे-चिंचवड मनपा व विद्यार्थी मिळून एकूण ५७ जणांनी भाग घेतला. कार्यशाळेत वानिकी तज्ञांची २३ व्याख्याने व ७ संबंधित स्थळ भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर कार्यशाळेच्या आयोजनाचा एकूण खर्च रु. ६०,०००/- पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आला.
४) आगाखान पॅलेस सुशोभिकरण प्रकल्प:
पुण्यातील आगाखान पॅलेस परिसराच्या सुशोभिकरणाचा प्रकल्प अहवाल संघाचे सभासद सर्वश्री. गु. शा. दळवी व सु. अ. भिलवडीकर ह्यांनी तयार केला.
५) मुळा नदीकाठ वनीकरण प्रकल्प:
पुण्यातील नवा पूल ते ओंकारेश्वर पुलाचे दरम्यान असलेल्या मुळा नदीचे दोन्ही काठावर वनीकरणाचा प्रकल्प अहवाल संघाचे सभासद सर्वश्री. थॉमस, गु. शा. दळवी, व.सि. जोशी ह्यांनी तयार केला व तो सामाजिक वनीकरण विभाग, पुणे यांचे मार्फत राबविण्यात आला.
p