१) अध्यक्षांचे मनोगत
सेवक संघाच्या यवतमाळ, व गडचिरोली ह्या दोन वृत्तस्तरीय शाखा अजून कार्यान्वित झालेल्या नाहीत. त्यासाठी विदर्भाचे सह अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न करून त्या शाखा कार्यान्वित करणे अपेक्षीत आहे. तसेच संघाच्या कोल्हापूर, ठाणे व औरंगाबाद ह्या तीन वृत्तस्तरीय शाखांनी अजून म्हणावा तसा जोर पकडलेला नाही त्यासाठी संघाचे उपाध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच खय्रा अर्थाने आपण महाराष्ट्र राज्यभर आपली मुळे पसरवू शकू.
सेवक संघाच्या सर्व वृत्तस्तरीय शाखांच्या सह अध्यक्षांनी त्यांच्या शाखांचे नामकरण ‘सेवानिवृत्त वनकर्मचारी संघ, महाराष्ट्र, (संबंधित) शखा’ असे करून त्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्याचे नावही बदलून घ्यावे. तसेच शाखेसाठी mahasevak(Concerned branch)@gmail.com याप्रमाणे ‘इमेल आयडी’ तयार करून घ्यावी. सेवक संघाचा ‘डाटा बेस’ अधिक मजबूत करण्याचे दृष्टीकोनातून त्यांनी खाली निर्देश केलेली माहिती त्वरीत संघटनेच्या mahsevak3@gmail.com ह्या ‘इमेल’ वर पाठवावी.
१. शाखेतील सर्व पदाधिकारी, तसेच आजीव व सर्वसाधारण सभासद यांची पूर्ण नावे, मोबाईल क्र. व ‘इमेल आयडी’, कोणत्या पदावरून निवृत्त झाले व निवासाचे ठिकाण. २. आजपर्यंत पूर्ण केलेली कामे आणी त्यापोटी मिळालेली व खर्च झालेली एकूण रक्कम व बँक खात्यातील शिल्लक रक्कम. ३. सध्या कार्यान्वित असलेली कामे. ४. भविष्यात हाती घ्यावयाची कामे
सुलभ माहिती वितरणासाठी मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांचा ‘सेवक कमिटी’ हा ‘एनक्रीप्टेड व्हॉट्स अॅप ग्रुप’ तयार करून घेण्यात आला आहे. तसेच परस्पर संपर्कासाठी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ चालू करण्यात येणार आहे. वृत्तस्तरीय शाखांमधूनही अशीच कार्यवाही अपेक्षित आहे.
सध्या सेवक संघाच्या हातात फारच थोडी कामे आहेत की ज्यापासून आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणी आपल्या संघटनेची कार्यक्षमता वाढविण्याचे दृष्टीकोनातून अशी कामे मिळविण्यासाठी झटून प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता अहे. जसे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विविक्षित कामासाठी घेणे, राष्ट्रीय रस्ते महामंडळातर्फे हाती घेण्यात आलेल्या रोपलागवडीच्या मूल्यमापनाची कामे इत्यादी. तेंव्हा सर्व सभासदांस आवाहन करण्यात येते की त्यांनी ह्या संदर्भात त्यांच्या काही सुचना असल्यास तसेच सभासदांची ‘मोबाईल/इमेल निर्देशिका’ तपासून त्यांत काही तृटी असल्यास किंवा आपल्या परीचीतांपैकी काहींची नावे त्यातून अवधानाने वगळली गेली असल्यास ती माहिती सभासदांच्या मनोगतात जरूर कळवावी. सध्या आपल्या मोबाईल निदेशिकेनुसार सेवानिवृत्त वन कार्मचाय्रांची संख्या केवळ ३५० इतकी असून त्यापैकी १/३ आजीव सभासद आहेत, १/३ सर्वसामान्य सभासद आहेत व उर्वरीत हे सभासदही नाहीत तेंव्हा माहे जून अखेरपर्यंत आपण किमान १००० सेवानिवृत्त वन कार्मचारी सेवक संघाचे सभासद होतील व त्यापकी ५०० हे आजीव सभासद होतील असे लक्ष्य आपण ठरविण्यास हरकत नसावी.
सेवक संघामध्ये घडणाय्रा घटनांची आद्यावत माहिती सर्व सभासदांना व्हावी तसेच त्यांचे मनोगतही समजावे ह्या उद्देशाने ‘सेवक वार्ता’ हे मासिक वार्तापत्र सुरु करण्यात येत आहे. सदर वार्तापत्राचे संपादक मंडळ मुख्य संपादक श्री. मा. ग. गोगटे, सह संपादक श्री. वि. त्र्यं. पत्की व कार्यकारी संपादक श्री. व. सि. जोशी असे राहील. सेवक संघाच्या सर्व वृत्तस्तरीय शाखांकडूनही त्यांच्या शाखेत घडणाय्रा घटनांची माहिती सदरे वार्तापत्रासाठी पाठविणे अपेक्षीत आहे. धन्यवाद!
२) प्रथम अंक – मार्च २०१७
दि. ०४.०१.२०१७ रोजी पुणे येथे सेवक संघाच्या कार्यकारिणीची मासिक सभा घेण्यात आली. त्यात दि. २८.१२.२०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत कायम करण्यात आला व यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी कार्यकारिणीची मासिक सभा घेण्यात यावी असे ठरविण्यात आले व दि. २२.०१.रोजी होणाय्रा नाशिक शाखेच्या कार्यकारिणीच्या सभेस सर्वश्री वि. त्र्यं. पत्की व प्रकाश कुकडोलकर यांनी केंद्रीय कार्यकारिणीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित रहावे असे ठरविण्यात आले.
दि. २२.०१.२०१७रोजी नाशिक वृत्तस्तरीय शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा जेष्ठ सभासद श्री. का. का. चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली व ३० सभासदांच्या उपस्थितीत नाशिक येथे संपन्न झाली. केंद्रीय कार्यकारिणी तर्फे कार्यकारी अध्यक्ष श्री. वी. त्र्यं. पत्की व उपाध्यक्ष श्री. प्रकाश कुकडोलकर हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. सदर सभेत नाशिक शाखेच्या सन २०१५-१६ वर्षाच्या रोखालेख्यात काही तृटी आढळून आल्यामुळे त्याची पूर्तता एक महिन्याचे आत करण्यात यावी असे ठरविण्यात आले. नाशिक शाखेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दोन प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात आले. परंतू सभासदांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सदर निवडणूक दि. ११.०३.२०१७ रोजी घ्यावयाच्या शाखेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात यावी असा निर्णय अध्यक्षांनी दिला. सदर सभेनंतर नाशिक शाखा कार्यकारिणी सदस्य व केंद्रीय कार्यकारिणीचे निरीक्षक यांनी नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांची भेट घेउन मुल्यांकानासंबंधीची कामे संस नाशिक शाखेस देण्यासंबंधी विनंती केली त्यास त्यांनी लगेच होकार दिला. ही एक समाधानाची गोष्ट आहे.
दि. २३.०१.२०१७ रोजी धुळे वृत्तस्तरीय शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री. बबन वाघ यांचे अध्यक्षतेखाली व २७ सभासदांच्या उपस्थितीत धुळे येथे संपन्न झाली. केंद्रीय कार्यकारिणी तर्फे कार्यकारी अध्यक्ष श्री. वी. त्र्यं. पत्की व उपाध्यक्ष श्री. प्रकाश कुकडोलकर हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. धुळे शाखेचे सह अध्यक्ष श्री. पी. एच. वाघ यांनी सदर सभा आयोजित करण्यात घेतलेला पुढकार स्तुत्य होता. धुळे शाखेने अल्पावधीत ७० सभासदांची नोंदणी केली ही घटनाही अभिमानास्पद होती. सदर सभेनंतर धुळे शाखा कार्यकारिणी सदस्य व केंद्रीय कार्यकारिणीचे निरीक्षक यांनी धुळे वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांची भेट घेउन मुल्यांकानासंबंधीची कामे संस नाशिक शाखेस देण्यासंबंधी विनंती केली त्यास त्यांनी लगेच होकार दिला. ही सुद्धा एक समाधानाची गोष्ट आहे.
दि. ०७.०२.२०१७ रोजी पुणे इथे सेवक संघाच्या कार्यकारिणीची मासिक सभा घेण्यात आली. सदर सभेत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत घेण्यात येणाय्रा कामांचे मूल्यमापन व देखरेख यासाठी तयार करण्यात येणाय्रा राष्ट्रीय स्तरावरील पॅनेलमध्ये अंतर्भाव होण्यासाठी जरूर ते फॉर्म भरून देण्यात यावे असे ठरले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार व पाणलोट विकास क्षेत्र संवर्धन व विकास ह्या योजनांतर्गत घेण्यात येणाय्रा कामांच्या मुल्यमापनाबाबत मी. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी त्यांचे कार्यालयात दि. ०८.०२.२०१७ रोजी होणाय्रा सभेस सर्वश्री. वि. त्र्यं. पत्की, वि. अ. धोकटे व प्रकाश कुकडोलकर यांनी हजर रहावे असे ठरले. कोल्हापूर शाखेचे पुनर्गठन करण्यासाठी सर्वश्री. शिरीष अस्थाना व वि. अ. धोकटे यांनी कोल्हापूर येथे जावे व ठाणे शाखेचे पुनर्गठन करण्यासाठी सर्वश्री. प्रकाश कुकडोलकर व प्रदीप कुलकर्णी यांनी ठाणे येथे जावे असे ठरले. चंद्रपूर शाखेचे पुनर्गठन करण्यासाठी श्री. अनंत मरकलवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचा पाठपुरावा करावा असे ठरले.
दि. १८.०२.२०१७ रोजी चंद्रपूर येथे श्री. वि. त्र्यं. पत्की यांचे अध्यक्षतेखाली चंद्रपूर शाखेची सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी सदर शाखेत ४० सेवानिवृत्त वनकर्मचारी सेवक संघाचे सभासद होण्यास तयार असल्याचे श्री. ए. एस.शेमला, अध्यक्ष, चंद्रपूर शाखा यांनी सांगीतले. सदर सभेत दि. ०६.०२.२०१७ रोजी श्री. रा. दा. तलमले, सहाय्यक वनसंरक्षक, (तेंदूपाने) चंद्रपूर हे त्यांच्या फिरते पथक, चंद्रपूर ह्या नात्याने रात्री ११ वाजता गस्तीवर असताना त्यांच्यावर व त्याचे पथकातील इतर वन कार्मचाय्रांवर स्थानिक वाळू माफीयातील गुंडांनी समुहीक हल्ला करून त्यांना जबरदस्त जखमी केले असे निदर्शनास आणून देण्यात आल्याने ह्या घटनेबाबत महाराष्ट्र शासनाकडे सेवक संघातर्फे निवेदन पाठविण्याचे ठरविण्यात आले.
दि. ०७.०३.२०१७ रोजी पुणे येथे सेवक संघाच्या कार्यकारिणीची मासिक सभा घेण्यात आली. सदर सभेत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.दि. ११.०३.२०१७ रोजी होणाय्रा नाशिक शाखा कार्यकारिणीच्या नवडणूकीसाठी श्री.प्रकाश कुकडोलकर यांनी हजर राहावे. वन गुन्ह्यासाठी अवलंब करावयाच्या प्रमाणित कार्यपद्धती वन विभागाच्या आघाडीच्या कर्मचाय्रांसाठी, वन प्रशिक्षण केंद्रांसाठी तयार करण्याबाबत कार्यवाही करणे.
दि. ११.३.२०१७ रोजी श्री. का. का. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक शाखा कार्यकारिणीच्या नवडणूकीमध्ये श्री. बी. डी. वाघ यांचे पॅनेल निवडून आले. सदर पॅनेलचे सभासद/पदाधिकारी याप्रमाणे आहेत. सर्वश्री. हे. कृ. ठाणेदार – अध्यक्ष, ब. द. वाघ – उपाध्यक्ष, अ. का. पाबळे – सचिव, श. बी. खैरनार – सहसचिव, व अ. गं. चव्हाणके – कोषाध्यक्ष. सदर सभेत नाशिक शाखेचे सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ साठीचे संक्षिप्त रोखालेखे सादर करण्यात आले व तपशीलवार रोखालेखे नंतर सादर करण्यात येतील असे सांगण्यात आले.
दि. १४.०३.२०१७ रोजी औरंगाबाद येथे श्री. राजेंद्र धोंगडे यांचे अध्यक्षतेखाली औरंगाबाद शाखेची सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेत सध्याच्या कार्यकारीणीचे पदाधिकारी कायम करण्यात आले.
दि. १९.०३.२०१७ रोजी सर्वश्री प्रकाश कुकडोलकर व प्रदीप कुलकर्णी यांनी ठाणे शाखेच्या सबलिकरणासाठी वडा, शिरसाड व कासा येथे विशेष सभांचे आयोजन करून १६ नूतन सभासदांची भरती केली. त्यापैकी दोन सभासद हे आजीव सभासद म्हणून भरती झाले आहेत
३) जरा हटके, परी नाही लटके!
चित्रकार: अशोक जुन्नरकर
४) सभासदांचे मनोगत
कृपया आपले मनोगत येथे व्यक्त करा. आपल्या सूचनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा उल्लेखही ह्याच सदरात आवर्जून केला जाईल. धन्यवाद!
वृत्तस्तरीय घटना/माझे मनोगत:
मी दि. २२.०१.२०१७ रोजी नाशिक येथे झालेल्या नाशिक वृत्तस्तरीय शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर होतो. त्यावेळी असे निदर्शनास आले की नाशिक शाखेच्या कार्यकारीणीने सादर केलेया सन २०१५ – १६ ह्या वर्षीच्या रोखालेख्यात काही दखलपात्र तृटी आहेत. जसे की झालेल्या खर्चाचा कोणताही सुयोग्य तपशील सादर करण्यात आला नव्हता. त्यामुळे सेवक संघाच्या रोखालेखा परिक्षकांनी सदर रोखालेखा अमान्य केला होता. अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारामुळे सेवक संघाची जनमानसातील चांगली प्रतिमा डागाळली जाते व आर्थिक व्यवहारातील अपेक्षित पारदर्शकतेस तडा जातो याचे भान ह्या कार्यकारीणीने ठवले नाही ह्याचा मला अत्यंत खेद वाटतो.
नाव: सुरेश भा. देशपांडे.
सभासद: वार्षिक/आजीव
इमेल: sureshdeshpande07@gmail.com
सादर करा
५) पुस्तक परिचय
‘वनासाठी फोनिक्सचा संघर्ष’
आपले नाशिक येथील एक सर्वश्रुत सभासद व वनसेवेसंबंधी अनेक चळवळींतील आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्री. सुरेश देश्पांडे यांनी नुकतेच त्यांचे ‘वनासाठी फोनिक्सचा संघर्ष’ हे अत्यंत माहितीपूर्ण व रोचक आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. सुरेश देशपांडे ह्यांना दुर्दैवाने वन विभागातील सेवाकाळात त्यांच्या वरीष्टांकडून एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा त्यांचा काहीही दोष नसताना शासकीय सेवेतून प्रलंबीत करण्यात आले होते. अशा विपरीत गोष्टींचा अपरिमित परिणाम एखाद्या कमकुवत मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर सहजगत्या होऊ शकतो परंतू सुरेश देशपांडे हे विचलीत न होता ह्या दुर्घटनेतून तावून सुलाखून बाहेर पडले व आपले निरपराधीत्व त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. एव्हढेच नव्हे तर ह्या कालावधीत त्यांनी कला, विधी, पत्रकारिता व उद्योग व्यवस्थापन ह्या क्षेत्रातील तीन पदव्याही संपादन केल्या. त्यांचा अन्यायाविरुद्धचा हा एकाकी लढा इतरांना एखाद्या राखेतून जिवंत होणाय्रा फोनिक्स पक्ष्याप्रमाणे प्रेरणादायक ठरण्यासारखा आहे. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात प्रसंगानुरूप घडलेल्या इतर रोचक घटनाही सदर पुस्तकात नमूद केल्या आहेत. त्या मुळातूनच वाचणे अधिक मनोरंजक ठरेल.
वसंत जोशी.
६) यशोगाथा
फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या उत्तर प्रदेश राज्य विधानसभेच्या निवडणूकात ८०% विक्रमी बहुमताने विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाचे ४४ वर्षीय लोकप्रिय युवा नेते योगी अद्वैतानंद यांची एकमताने मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. वन विभागासाठी अत्यंत अभिमानाची घटना म्हणजे त्यांचे पिताजी श्री. आनंद्सिंह बिस्त हे उत्तर प्रदेश वनविभागात वनक्षेत्रपाल ह्या पदावर वनसेवेत रुजू झाले होते. त्यांचे सेवक संघ मन:पूर्वक अभिनंदन करत आहे.
केंद्रीय वन, पर्यावरणव हवामान बदल विभागाने श्री. राजेंद्र धोंगडे, अध्यक्ष औरंगाबाद शाखा यांची रिजनल एमपॉवरमेंट कमिटीवर अशासकीय सभासद म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.