

सेवक रोपवाटीका, अमरावती एका नेत्रदीपक पथदर्शक वाटचालीचा मागोवा
सेवक संघाच्या अमरावती शाखेने आपल्या संघशक्तीच्या जोरावर सप्टेंबर २०१६ ते जुन २०१७ ह्या केवळ १० महिन्यांच्या कालावधीत अमरावती येथे उप वनसंरक्षक, अमरावती यांचे वतीने सेवक रोपवाटीका स्थापित करून त्यात दमदार अशा ५७००० दुर्मिळ व औषधी रोपांची निर्मिती करून दाखविली. सदर रोवाटीकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची तपशीलवार माहिती सोबतच्या तक्त्यात दर्शविली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सदर रोपांची अमरावती येथे त्यांचेतर्फे घडवून आणलेल्या वन महोत्सवाच्या कार्यक्रमात लागवडही करून दाखविली हा सर्वच एक अभूतपूर्व विक्रम असून सेवक संघासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या ह्या वाटचालीत सेवक संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. वि. त्र्यं. पत्की यांनी त्यांना प्रेरणा देउन मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सेवक अमरावतीच्या ह्या प्रयत्नांतून त्यांना अमरावती वन विभाकडून प्रतीरोप रु. ६२/- प्रमाणे मानधन मिळणार आहे त्यापैकी आजपर्यन्त झालेला खर्च वजा जाता सेक संघास मोठा आर्थिक धनलाभही होणार आहे. सेवक अमरावतीच्या ह्या नेत्रदीपक विक्रमात सहभागी असणाय्रा आघाडीच्या मानकय्रांची नावे आहेत सर्वश्री. विजय भोसले, संजय जगताप, शंकर वहाणे, पी. के. गडबैल, सी. एस. चौधरी, डी. एस. गडपांडे, भगवान फर्तोडे, सतीश गावंडे, व विशाल निम्बोरकर. ह्या सर्वांचे सेवक संघातर्फे मन:पूर्वक अभिनंदन.
दुर्मिळ वनौषधी रोपांचे प्रदर्शन
अमरावती येथील कन्सेप्ट स्कूलमध्ये नोव्हेंबर २०१७ मध्ये भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सेवानिवृत्त वनकर्मचारी संघाच्या अमरावती शाखेने पुढाकार घेउन त्यात स्वत:चे एक दालन उभे केले व ह्या दालनात त्यांनी तयार केलेल्या ५० दुर्मिळ वनौषधी रोपांचे तसेच त्याबाबत सविस्तर माहेती देणारी पत्रके यांचे प्रदर्शन केले. ह्या दालनास अनेक मान्यवरांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली असून त्यापासून अमुल्य माहिती प्राप्त करून घेतली आहे. अमरावती शाखेच्या ह्या अभूतपूर्व उपक्रमाबाबत सेवक संघामार्फत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !




जेष्ठ वनाधिकारी व एक नावाजलेले पक्षीतज्ञ श्री. मारुती चितमपल्ली ह्यांना पुणे येथे जानेवारी २०१८ मध्ये भरविण्यात येणाय्रा किर्लोस्कर वसुंधरा अन्तर राष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सेवक संघातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
दुर्मिळ वनौषधी रोपांचे प्रदर्शन
सेवक संघाच्या अमरावती शाखेतर्फे दुर्मिळ वनौषधी रोपांचे प्रदर्शन पुन्हा एकवार अमरावती येथील बी एड कॉलेजमध्ये दि. २५ ते २८ डीसेम्बर २०१७भरविण्यात आले. सदर प्रदर्शनात १०० विविध वनौषधी रोपांचे मांडणी करण्यात आली होती. त्यानंतर हीच रोपे अमरावती येथील शासकीय औषधी निर्माण महाविद्यालयात दि. २८ डीसेम्बर २०१७ ते ३ जानेवारी २०१८ ठेवण्यात येणार असून त्यात १२ संजीवन रोपे व ६ ऑक्सीजन बॉंम्ब यांचाही समावेष करण्यात आला आहे. ही कल्पना अतिशय नाविन्यपुर्ण असून त्याबाबत तपशील सोबतच्या पत्रकात दिला आहे. ह्या उपक्रमाबाबत अमरावती शाखेचे सेवक संघामार्फत मन:पूर्वक अभिनंदन !