दु:खद निधन
कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की.श्री. बी. व्ही. ढोले, (एस. एफ. आर.सी. १९५९- ६१ च्या तुकडीचे वर्गबंधू) माजी सहाय्यक वन संरक्षक, सातारा यांचे कोल्हापूर मुक्कामी दि. ३० मे २०१७ रोजी मुत्र विकाराच्या आजाराने दु:खद निधन झाले. श्री. ढोले हे स्वेच्छा निवृत्ती घेउन वन सेवेतून निवृत्त झाले होते.
तसेच श्री. व्ही. जे. वैद्य, (एस. एफ. आर.सी. १९५९- ६१ च्या तुकडीचे वर्गबंधू) माजी सहाय्यक संचालक, सामाजिक वनीकरण विभाग, अलिबाग यांचे मुलुंड मुक्कामी दि. २१ ऑगस्ट २०१६ रोजी दुख:द निधन झाले.
कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की सेवक संघाचे एक जेष्ठ विश्वस्थ श्री व. के. चावरे यांचे दि. १९ डिसेम्बर २०१७ रोजी पुणे येथे दु:खद निधन झाले. सेवक तर्फे त्याना सादर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी नाशिक येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन २०१७ मध्ये दिवंगत झालेल्या खालील प्रमाणे सह्काय्रांस आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सर्वश्री वी. के चावरे, डॉ. मोहन झा, रामानुज चौधरी, जी. एस. कंडे, ए. व्ही. मार्डीकर, एम. एम. कुलकर्णी, विश्वास, एम. एम. मुकर्जी नागठाने व जचपेले.
दि. ०१ मार्च २०१९ रोजी सेवानिवृत्त वन कर्मचारी संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. पुरषोत्तम गाडबैल यांचे अमरावती येथे दुख:द निधन झाले. सेवक संघातर्फे त्यांंना सादर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
माहे मार्च २०१९ मध्ये नागपूरस्थित श्री. बर्डे, अमरावतीस्थित श्री. एस. जी. बापट व पुणेस्थित श्री. एन. सी. पाटील याचे दुख:द निधन झाले. सेवक संघातर्फे त्यांना सादर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे.